शेषनाग ची आणि आस्तिक मुनि ची गोष्ट

शेषनाग ची आणि आस्तिक मुनि ची गोष्ट

गरुडाने आणलेला अमृत कलश नागांनी अमृत पिण्याआधीच इंद्र घेऊन गेला आणि नागांना अमृत मिळालंच नाही. आता ते आईच्या शापापासून आपला बचाव करण्यासाठी आणखी काही उपाय सुचतो का याचा विचार करू लागले. या नागांपैकी शेषनागाने त्याच्या भावांच्या वागण्याने त्रस्त होऊन त्यांच्यापासून स्वतंत्र आयुष्य जगण्याचं निश्चित केलं. त्याने ब्रम्हदेवाची उपासना करण्यासाठी वर्षानुवर्ष केवळ हवा पिऊन कठोर तपश्चर्या केली. शेवटी ब्रह्मदेव त्याच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न झाला आणि त्याला दर्शन दिलं. ब्रह्मदेवाने शेषनागाला विचारलं, "शेषा! तुझ्या कठोर तपश्चर्येचं प्रयोजन काय आहे? तू स्वतःला इतका त्रास का देतो आहेस?" शेषाने ब्रह्मदेवाला सांगितलं, "भगवंता, माझे सर्व भाऊ अतिशय मूर्ख आहेत आणि नेहमीच एकमेकांशी भांडत असतात. विनता आणि तिचे पुत्र अरुण आणि गरुड यांच्याशी न बोलून मी वैर ओढवून घेतलं आहे. मला त्यांच्याबरोबर राहायचं नाही. मला माझ्या भावांपासून दूर राहाता यावं हेच माझ्या तपाचं हेच उद्दिष्ट आहे.

गरुडाने आणलेला अमृत कलश नागांनी अमृत पिण्याआधीच इंद्र घेऊन गेला आणि नागांना अमृत मिळालंच नाही. आता ते आईच्या शापापासून आपला बचाव करण्यासाठी आणखी काही उपाय सुचतो का याचा विचार करू लागले.

 या नागांपैकी शेषनागाने त्याच्या भावांच्या वागण्याने त्रस्त होऊन त्यांच्यापासून स्वतंत्र आयुष्य जगण्याचं निश्चित केलं. त्याने ब्रम्हदेवाची उपासना करण्यासाठी वर्षानुवर्ष केवळ हवा पिऊन कठोर तपश्चर्या केली. शेवटी ब्रह्मदेव त्याच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न झाला आणि त्याला दर्शन दिलं.

ब्रह्मदेवाने शेषनागाला विचारलं, "शेषा! तुझ्या कठोर तपश्चर्येचं प्रयोजन काय आहे? तू स्वतःला इतका त्रास का देतो आहेस?" शेषाने ब्रह्मदेवाला सांगितलं,

"भगवंता, माझे सर्व भाऊ अतिशय मूर्ख आहेत आणि नेहमीच एकमेकांशी भांडत असतात. विनता आणि तिचे पुत्र अरुण आणि गरुड यांच्याशी न बोलून मी वैर ओढवून घेतलं आहे. मला त्यांच्याबरोबर राहायचं नाही. मला माझ्या भावांपासून दूर राहाता यावं हेच माझ्या तपाचं हेच उद्दिष्ट आहे.