गरुडाच्या जन्माची गोष्ट

गरुडाच्या जन्माची गोष्ट

"पक्षीराज गरूड़चा जन्म कसा झाला? तो सापांचा शत्रू आहे?" आपल्या नाग पुत्रांच्या मदतीने कद्रूने कपटाने विनता विरुद्ध पैज जिंकली आणि विनता तिची दासी बनून राहू लागली. आपल्या पहिल्या पुत्राच्या अरूणच्या शापामुळे दास्यत्वाचे जीवन जगणारी विनता त्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या दुसऱ्या पुत्राच्या जन्माची प्रतीक्षा करू लागली. योग्य वेळ येताच विनताच्या दुसऱ्या अंड्यातून महाशक्तीशाली गरूडाने जन्म घेतला. त्याची शक्ती गती दीप्ती आणि बुद्धी विलक्षण होती. डोळे वीजेसमान पिवळे आणि शरीर अग्नीसम तेजस्वी होतं. जेव्हा आपले विशालकाय पंख फडफडवत तो आकाशात भरारी घेत असे तेव्हा वाटे साक्षात अग्नीदेवच येत आहेत. जेव्हा गरूडाने आपल्या आईला दासीच्या रूपात पाहिलं तेव्हा त्याने तिला त्याचं कारण विचारलं. विनताने गरूडाला कद्रू सोबतच्या पैजे विषयी संगितले.

"पक्षीराज गरूड़चा जन्म कसा झाला? तो सापांचा शत्रू आहे?"

आपल्या नाग पुत्रांच्या मदतीने कद्रूने कपटाने विनता विरुद्ध पैज जिंकली आणि विनता तिची दासी बनून राहू लागली. आपल्या पहिल्या पुत्राच्या अरूणच्या शापामुळे दास्यत्वाचे जीवन जगणारी विनता त्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या दुसऱ्या पुत्राच्या जन्माची प्रतीक्षा करू लागली.

 

योग्य वेळ येताच विनताच्या दुसऱ्या अंड्यातून महाशक्तीशाली गरूडाने जन्म घेतला. त्याची शक्ती गती दीप्ती आणि बुद्धी विलक्षण होती. डोळे वीजेसमान पिवळे आणि शरीर अग्नीसम तेजस्वी होतं. जेव्हा आपले विशालकाय पंख फडफडवत तो आकाशात भरारी घेत असे तेव्हा वाटे साक्षात अग्नीदेवच येत आहेत. जेव्हा गरूडाने आपल्या आईला दासीच्या रूपात पाहिलं तेव्हा त्याने तिला त्याचं कारण विचारलं. विनताने गरूडाला कद्रू सोबतच्या पैजे विषयी संगितले.