नामजपाने प्रसन्न होऊन गजाननाने आपल्या भक्ताला साक्षात आपले रूप बहाल केले त्या निस्सीम गणेश भक्ताची नामा कोळ्याची अर्थात भ्रूशुंडी ऋषींची कथा. घनदाट अशा दंडकारण्यात नामा कोळी आणि त्याचे कुटुंब राहात असे.
नामा कोळी तिथून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना लुटून त्यांची हत्या करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. तीच त्याची दिनचर्या होती. एके दिवशी समोरून मुद्गल ऋषी हातात कुबडी आणि कमंडलू घेऊन येत होते.
नामा कोळ्याने त्यांना पाहिलं. तो आपली कुऱ्हाड घेऊन त्यांना मारण्यासाठी पुढे सरसावला; परंतु त्याने हात उगारताक्षणी त्याच्या हातातली कुऱ्हाड मागच्यामागे गळून पडली, असे तीन वेळा झाले. नामा कोळ्याला काय घडते आहे हे कळेना.
त्याची ती अवस्था बघून मुद्गल ऋषी त्याला म्हणाले, "अरे, उचल कुन्हाड, मार मला! काय झालं तुझी कुऱ्हाड अशी खाली का पडली ?” हे ऐकून नामा कोळ्याला फार राग आला. त्याने पुन्हा वार करण्यासाठी कुन्हाड उगारली; पण पुन्हा तेच.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices