अजगरोपाख्यान - नहुष उद्धार

अजगरोपाख्यान - नहुष उद्धार

आपल्या अहंकारामुळे अगस्त्य ऋषींच्या शापाचा धनी झालेल्या नहूषाने पृथ्वीवर अनेक वर्षे एका अजगराच्या रुपात काढली. शेवटी नहुषाचा उद्धार कसा झाला हे आपण नहुषाच्या गोष्टीच्या या भागात पाहू. एकेकाळी इंद्र असलेल्या नहुषाचे पृथ्वीवर एका सापाच्या रुपात अधःपतन झाल्याला हजारो वर्षे लोटली होती. महर्षि अगस्त्य यांच्या शापामुळे इतक्या वर्षांच्या काळानंतरही नहुषाला हे सगळं व्यवस्थित लक्षात होतं. त्याला हे माहित होतं की तो चंद्रवंशी सम्राट आयु यांचा पुत्र आहे, तसेच मिळालेले इंद्रपद स्वतःच्या अहंकारामुळे गमावणारा एक अभागी पुरुषदेखील आहे. सर्परूपी स्वतःची चूक सदैव आठवत आणि त्याबद्दल पश्चात्ताप करत असे, आणि मुक्तीची वाट पहात बसे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या सरस्वती नदी किनारी सर्परुपात राहणारा नहुष जीवजंतू आणि जवळ आलेल्या माणसांना खाऊन आपली भूक भागवत असे. अशा रीतीने आयुष्य घालवत असताना आता नहुष द्वापार युगात येऊन पोचला होता. वनवासकाळात पांडव फिरत फिरत याच वनात आले जेथे नहुष रहात होता. एकदा अन्नाच्या शोधात भीम चुकून नहुषच्या जवळ गेला. बऱ्याच दिवसांपासून उपाशी असलेल्या नहुषाने भीमाला बघून त्याला खायचा निश्चय केला. सर्परूपी नहुषच्या विशाल आकाराने चकित झालेला भीम क्षणभर जागीच थांबला. जिभल्या चाटत नहुष पुढे झाला. आपल्या बळाचा कायम गर्व असलेल्या भीमाला आज एक साप पकडू पाहत होता आणि सुटण्याची खूप धडपड करुनही भीमाला त्याच्या तावडीतून सुटता येईना. भीमाला नहुष खाऊन टाकणार इतक्यात तेथे धर्मराज युधिष्ठीर आला. भीम इतका वेळ का परतला नाही या चिंतेत युधिष्ठीर त्याला शोधत तेथे आला होता. आपल्या महा-बलशाली भावाला एका सापाच्या तावडीत सापडलेला पाहुन युधिष्ठिराच्या ये लक्षात आलं की हा कुणी साधासुधा साप असणे शक्य नाही. “हे सर्पा, मी युधिष्ठीर आहे. तू ज्याला खायला निघाला आहेस तो माझा धाकटा भाऊ आहे. कृपा करून तू त्याला सोड. मी त्याच्या बदल्यात तुला दुसरं उत्कृष्ट अन्न द्यायचं वचन देतो.” भीमाला वाचवण्यासाठी युधिष्ठिराने सापाला सांगितले. “हे कुंती पुत्रा, तू कोण आहेस हा मला चांगले माहित आहे, आणि तुझ्या भावालाही मी ओळखतो. पण भुकेच्या आगीमुळे माझा नाईलाज झाला आहे. खूप दिवसांपासून उपाशी असल्यामुळे भीमासारखा धष्टपुष्ट माणूस खाऊनच मी माझा जीव वाचवू शकतो. तू परत जा. आज मी भीमाला खाणार हे नक्की !” भुकेने कासावीस झालेला नहुष म्हणाला. “थोडा थांब सर्पश्रेष्ठा, तू नक्कीच कुणीतरी वेगळा आहेस. कुणीतरी देवता, दैत्य किंवा गंधर्व ? नक्कीच तुझ्याकडे एक अलौकिक शक्ती आहे. त्याशिवाय हजार हत्तीचे बळ असणाऱ्या भीमाला असं पराजित करणं हे कुणा साध्यासुध्या सापाला जमणं शक्य नाही. कृपा करून आपली ओळख सांगा !” असे म्हणून युधिष्ठिराने यह कह कर नहुषाची ओळख करून घ्यायचा प्रयत्न केला. “उत्तम ! हे कुंतीपुत्रा, मला माहित होतं की तू मला नक्कीच ओळखशील. मी तुझे पूर्वज चंद्रवंशी राजे आयु यांचां पुत्र नहुष आहे. माझ्याच एका चुकीमुळे एकेकाळी इंद्रासनावर बसणारा हा नहुष अगस्त्य ऋषींच्या शापाचा धनी झाला आणि आज सर्प योनीत जगत आहे. पण त्या शापावर अगस्त्य ऋषींनी मला हे वरदानही दिले होते की जो माझ्या जवळ येईल त्याची शक्ती मला पाहताच क्षीण होईल आणि मी त्याला सहज खाऊ शकेन!” अशा रीतीने नहुषने आपला सगळा वृतांत धर्मराजाला सांगितला. “हे आयुपुत्रा! माझा प्रणाम स्वीकार कर ! तुला भेटून मला खूप आनंद झाला आहे. चंद्रवंशाच्या सुरुवातीच्या काळात जे महान शासक होऊन गेले त्यांच्याविषयी मी फक्त ऐकले होते. आज तुम्हाला भेटायचे सद्भाग्य मला लाभले. पण हे नहुष! तू फक्त आमचा पूर्वजच नव्हेस तर आमचा रक्ताचा नातेवाईकही आहेस. आमच्याही अंगात चंद्रवंशाचे रक्त वाहत आहे. त्यामुळे तुझ्याच वंशाच्या भीमाला तू खाणे हे अयोग्य आहे आयुपुत्रा!” आपल्या शास्त्रज्ञानाचा उपयोग करत युधिष्ठिरानेने नहुषला सांगितले.आतापर्यंत नहुषदेखील धर्मराजाच्या ज्ञानाने आणि चतुराईने प्रभावित झाला होता. तो युधिष्ठिराला म्हणाला “ ठीक आहे पांडुपुत्रा, तू असं म्हणतोस तर मी तुझ्या धाकट्या भावाचे प्राण वाचवण्याची एक संधी तुला अवश्य देईन. जर तू माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिलीस तर मी भीमाला सोडून देईन. नाहीतर तू माझ्या आणि माझ्या अन्नाच्या मध्ये येऊ नयेस!” युधिष्ठिराला सर्परूपी नहुषाने अट घातली. “ठीक आहे आयुपुत्रा! विचार जे विचारायचे आहे ते. मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे !” युधिष्ठिर म्हणाला. “राजा युधिष्ठिरा ! मला सांग की ब्राह्मण म्हणजे कोण आणि त्याला कसे ओळखावे?” नहुषने प्रश्न विचारला.“सर्पराज! ज्याच्यात सत्य, दान, क्षमा, सुशीलता, क्रूरतेचा अभाव, तपस्या आणि दया हे सद्गुण दिसतात त्याला ब्राह्मण म्हटले आहे. जाणण्यायोग्य तत्व तर परब्रम्हच आहे जे दुःख आणि सुखांपासून दूर आहे, आणि जिथे पोचल्यावर, किंवा जे जाणल्यावर मनुष्य सगळ्या शोकांपासून मुक्त होतो!” युधिष्ठिराने ने ब्राह्मणाची व्याख्या सांगितली. “पण हे सगळे गुण तर शुद्रांमध्येही असू शकतात!” नहुषने पुन्हा प्रश्न विचारला.“अवश्य...जर शुद्रात सत्य आणि धर्मनिष्ठा इत्यादी उपयुक्त लक्षणे असतील तर तो शुद्र नव्हे तर ब्राह्मण मानला जातो, आणि ज्या मनुष्यात ही लक्षणे नसतील त्याला शूद्रच म्हणायला हवे!” युधिष्ठिराने उत्तर दिले,“हे, धर्मराज, जर एखाद्या व्यक्तीची जात फक्त त्याच्या कर्मावरच ठरत असल तर जन्मानुसार जाती ठरवल्या जाणे कितपत योग्य आहे?” नहुष युधिष्ठिराच्या उत्तरांनी जणू संतुष्टच होत नव्हता. “हे सर्पराज, या विषयावर स्वयंभू मनु यांनी सविस्तर भाष्य केले आहे, की ज्या बालकाच्या जन्मानंतर त्याला वेदांचे ज्ञान दिले जात नाही ते कुठल्याही जातीत जन्माला आले तरी ते शूद्रच म्हणायला हवे. त्यामुळे असा नियम आहे की पित्याला आचार्य होऊन व मातेला सावित्री होऊन आपल्या नवजात बाळाला वेदांचे ज्ञान देणे अत्यंत आवश्यक आहे. इतकेच नव्हे सर्पराज, तर स्वयंभू मनु यांनी पुढे म्हटले आहे की मिश्र जातींच्या विवाहसंबंधांमधून जन्माला आलेल्या बालकांच्या जातीची ओळखल तोपर्यंत पटणे अशक्य आहे जोपर्यंत ती त्यांच्या जातीला साजेसे गुण दाखवायला लागत नाहीत. हे नहुष, धर्माचे अचूल आचरण करून व सत्याच्या मार्गाचा स्वीकार करून कुठलाही शुद्र ब्राह्मण होऊ शकतो आणि यांचे पालन न करणारा, पण ब्राह्मण म्हणून जन्माला आलेला कुणीही शुद्र होऊ शकतो !” युधिष्ठिराने नहुषला जातीची व्याख्या सांगितली. वेदज्ञ नहुषाबरोबर ज्ञानाची चर्चा करताना युधिष्ठिरानेही त्याला धर्मासंबंधी अनेक प्रश्न विचारले. सगळ्यात पहिला प्रश्न असा होता, की मनुष्याला मोक्षप्राप्ती कशी होऊ शकते? याला उत्तर देताना नहुष म्हणाला “हे भरतवंशी, जो मनुष्य उचित दान धर्म करतो , सदैव गोड आणि सत्य बोलतो, तसेच कुठल्याही प्राण्याला कुठल्याही प्रकारे त्रास देत नाही, त्याला मोक्ष मिळणे निश्चित आहे!” “हे सर्प-श्रेष्ठा, कृपा करून हे सांगा की दान आणि सत्य बोलणे यातील उत्कृष्ट धर्म कोणता? शिवाय सदाचार आणि कुठल्याही प्राण्याला इजा न करणे यात कुठल्या प्रकारचे आचरण निवडायला हवे?” या विषयात आणखी माहिती मिळवण्यात युधिष्ठिराला रस होता. “हे कुंतीकुमारा, हे सगळेच गुण एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत. परिस्थितिनुसार आणि आवश्यकतेनुसार यांचे स्वरूप ठरते. याशिवाय हेही लक्षात ठेव राजा, की जिथे गोड पण असत्य बोलावे लागेल तेथे सदाचार बाजूला ठेवून सत्याला प्राधान्य द्यायला हवे. तसेच कुठल्याही प्राण्याच्या जीवाचे मोल हे कुठल्याही दानधर्मापेक्षा जास्त आहे. जर कुणाला इजा न करणे आणि दानधर्म किंवा सदाचार करणे यात निवड करायची असेल तेथे नेहेमीच कुणाला इजा न करण्याला प्राधान्य देणे हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे!” नहुषने मोक्षप्राप्तिचा मार्ग दाखवताना युधिष्ठिराला सांगितले. यानंतर स्वर्गप्राप्तिविषयी अधिक जाणून घेण्यासाठी युधिष्ठिराने नहुषला जन्ममृत्युच्या चक्राविषयी विचारले. त्यावर उत्तर देताना नहुष म्हणाला “ हे युधिष्ठिरा, मी आधीच सांगितल्याप्रमाणे जो मानुष सदाचारी असेल, धर्माचरण करणारा असेल, आणि कुणाला इजा न करणारा असेल त्याला मोक्ष प्राप्ती होते. याच्या उलट आचरण करणारा मनुष्य, जो सदैव लोभ, क्रोध व कामवासनेने ग्रासलेला असेल , त्याला वारंवार मनुष्य किंवा इतर खालील स्तरावरच्या योनींमध्ये जन्म घेऊन संसारिक कष्ट भोगावे लागतात. सगळ्याच प्राण्यांमध्ये परमचेतनेच्या रुपात “आत्म्या”चा वास असतो. हा आत्मा भौतिक सुखांच्या प्राप्तीसाठी इंद्रियांचा उपयोग करत राहतो. म्हणूनच हे कुंतीकुमारा, इंद्रियांवर संयम ठेवणे हा आत्म्याच्या मुक्तीचा एकमेव मार्ग आहे!” “अति उत्तम। हे सर्परूपी नहुषा, मी तुझ्या ज्ञानाने अत्यंत प्रसन्न झालो आहे. कृपा करून मला आता हे सांगा की तुझ्यासारखा गुणी धर्मात्मा राजर्षीदेखील हे सगळे ज्ञान असताना आपल्या इंद्रियांवरचा ताबा कसा गमावून बसला, आणि अशा रीतीने शापित झाला?” युधिष्ठिराने विचारले. “हे धर्मराज, हेच तर नामुष्याचे सर्वात मोठे दुर्भाग्य आहे, की सगळे माहित असूनही त्याला हे सत्य माहित नाही. समृद्धि आणि श्रीमंतीच्या झगमगाटाने मोठे मोठे विद्वानही आंधळे होऊन जातात. इन्द्रपदाच्या अहंकाराने मीही असाच मूर्खासारखा वागलो. पण तुला धन्यवाद कारण तू इथे येऊन माझ्याशी या ज्ञानाविषयी चर्चा केलीस. अगस्त्य ऋषींनी सांगितल्याप्रमे तुझ्याशी धर्मसंवाद केल्यामुळेच मला पुन्हा स्वर्गलोकात परतणे शक्य होते. तू आता माझ्या मुक्तीचा मार्ग मोकळा केलं आहेस, युधिष्ठिरा!” नहुष म्हणाला. असे म्हणून सर्परूपी नहुषने भीमाला सोडून दिले. त्याच क्षणी ऋषी अगस्त्यांनी नहुषला दिलेल्या शापाचा अंत झाला. आपल्या मूळ स्वरुपात आल्यावर नहुषाने युधिष्ठिर आणि भीमाला आशीर्वाद दिले आणि आपले नश्वर शरीर त्यागून त्याने स्वर्गलोकाच्या दिशेने प्रस्थान केले.

आपल्या अहंकारामुळे अगस्त्य ऋषींच्या शापाचा धनी झालेल्या नहूषाने पृथ्वीवर अनेक वर्षे एका अजगराच्या रुपात काढली. शेवटी नहुषाचा उद्धार कसा झाला हे आपण नहुषाच्या गोष्टीच्या या भागात पाहू.

 

एकेकाळी इंद्र असलेल्या नहुषाचे पृथ्वीवर एका सापाच्या रुपात अधःपतन झाल्याला हजारो वर्षे लोटली होती. महर्षि अगस्त्य यांच्या शापामुळे इतक्या वर्षांच्या काळानंतरही नहुषाला हे सगळं व्यवस्थित लक्षात होतं. त्याला हे माहित होतं की तो चंद्रवंशी सम्राट आयु यांचा पुत्र आहे, तसेच मिळालेले इंद्रपद स्वतःच्या अहंकारामुळे गमावणारा एक अभागी पुरुषदेखील आहे. सर्परूपी स्वतःची चूक सदैव आठवत आणि त्याबद्दल पश्चात्ताप करत असे, आणि मुक्तीची वाट पहात बसे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या सरस्वती नदी किनारी सर्परुपात राहणारा नहुष जीवजंतू आणि जवळ आलेल्या माणसांना खाऊन आपली भूक भागवत असे. अशा रीतीने आयुष्य घालवत असताना आता नहुष द्वापार युगात येऊन पोचला होता.


वनवासकाळात पांडव फिरत फिरत याच वनात आले जेथे नहुष रहात होता. एकदा अन्नाच्या शोधात भीम चुकून नहुषच्या जवळ गेला. बऱ्याच दिवसांपासून उपाशी असलेल्या नहुषाने भीमाला बघून त्याला खायचा निश्चय केला. सर्परूपी नहुषच्या विशाल आकाराने चकित झालेला भीम क्षणभर जागीच थांबला. जिभल्या चाटत नहुष पुढे झाला. आपल्या बळाचा कायम गर्व असलेल्या भीमाला आज एक साप पकडू पाहत होता आणि सुटण्याची खूप धडपड करुनही भीमाला त्याच्या तावडीतून सुटता येईना.
भीमाला नहुष खाऊन टाकणार इतक्यात तेथे धर्मराज युधिष्ठीर आला. भीम इतका वेळ का परतला नाही या चिंतेत युधिष्ठीर त्याला शोधत तेथे आला होता. आपल्या महा-बलशाली भावाला एका सापाच्या तावडीत सापडलेला पाहुन युधिष्ठिराच्या ये लक्षात आलं की हा कुणी साधासुधा साप असणे शक्य नाही.

“हे सर्पा, मी युधिष्ठीर आहे. तू ज्याला खायला निघाला आहेस तो माझा धाकटा भाऊ आहे. कृपा करून तू त्याला सोड. मी त्याच्या बदल्यात तुला दुसरं उत्कृष्ट अन्न द्यायचं वचन देतो.” भीमाला वाचवण्यासाठी युधिष्ठिराने सापाला सांगितले.


“हे कुंती पुत्रा, तू कोण आहेस हा मला चांगले माहित आहे, आणि तुझ्या भावालाही मी ओळखतो. पण भुकेच्या आगीमुळे माझा नाईलाज झाला आहे. खूप दिवसांपासून उपाशी असल्यामुळे भीमासारखा धष्टपुष्ट माणूस खाऊनच मी माझा जीव वाचवू शकतो. तू परत जा. आज मी भीमाला खाणार हे नक्की !” भुकेने कासावीस झालेला नहुष म्हणाला.

“थोडा थांब सर्पश्रेष्ठा, तू नक्कीच कुणीतरी वेगळा आहेस. कुणीतरी देवता, दैत्य किंवा गंधर्व ? नक्कीच तुझ्याकडे एक अलौकिक शक्ती आहे. त्याशिवाय हजार हत्तीचे बळ असणाऱ्या भीमाला असं पराजित करणं हे कुणा साध्यासुध्या सापाला जमणं शक्य नाही. कृपा करून आपली ओळख सांगा !” असे म्हणून युधिष्ठिराने यह कह कर नहुषाची ओळख करून घ्यायचा प्रयत्न केला.

 

“उत्तम ! हे कुंतीपुत्रा, मला माहित होतं की तू मला नक्कीच ओळखशील. मी तुझे पूर्वज चंद्रवंशी राजे आयु यांचां पुत्र नहुष आहे. माझ्याच एका चुकीमुळे एकेकाळी इंद्रासनावर बसणारा हा नहुष अगस्त्य ऋषींच्या शापाचा धनी झाला आणि आज सर्प योनीत जगत आहे. पण त्या शापावर अगस्त्य ऋषींनी मला हे वरदानही दिले होते की जो माझ्या जवळ येईल त्याची शक्ती मला पाहताच क्षीण होईल आणि मी त्याला सहज खाऊ शकेन!” अशा रीतीने नहुषने आपला सगळा वृतांत धर्मराजाला सांगितला.

“हे आयुपुत्रा! माझा प्रणाम स्वीकार कर ! तुला भेटून मला खूप आनंद झाला आहे. चंद्रवंशाच्या सुरुवातीच्या काळात जे महान शासक होऊन गेले त्यांच्याविषयी मी फक्त ऐकले होते. आज तुम्हाला भेटायचे सद्भाग्य मला लाभले. पण हे नहुष! तू फक्त आमचा पूर्वजच नव्हेस तर आमचा रक्ताचा नातेवाईकही आहेस. आमच्याही अंगात चंद्रवंशाचे रक्त वाहत आहे. त्यामुळे तुझ्याच वंशाच्या भीमाला तू खाणे हे अयोग्य आहे आयुपुत्रा!” आपल्या शास्त्रज्ञानाचा उपयोग करत युधिष्ठिरानेने नहुषला सांगितले.

आतापर्यंत नहुषदेखील धर्मराजाच्या ज्ञानाने आणि चतुराईने प्रभावित झाला होता. तो युधिष्ठिराला म्हणाला “ ठीक आहे पांडुपुत्रा, तू असं म्हणतोस तर मी तुझ्या धाकट्या भावाचे प्राण वाचवण्याची एक संधी तुला अवश्य देईन. जर तू माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिलीस तर मी भीमाला सोडून देईन. नाहीतर तू माझ्या आणि माझ्या अन्नाच्या मध्ये येऊ नयेस!” युधिष्ठिराला सर्परूपी नहुषाने अट घातली.


“ठीक आहे आयुपुत्रा! विचार जे विचारायचे आहे ते. मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे !” युधिष्ठिर म्हणाला.

“राजा युधिष्ठिरा ! मला सांग की ब्राह्मण म्हणजे कोण आणि त्याला कसे ओळखावे?” नहुषने प्रश्न विचारला.

“सर्पराज! ज्याच्यात सत्य, दान, क्षमा, सुशीलता, क्रूरतेचा अभाव, तपस्या आणि दया हे सद्गुण दिसतात त्याला ब्राह्मण म्हटले आहे. जाणण्यायोग्य तत्व तर परब्रम्हच आहे जे दुःख आणि सुखांपासून दूर आहे, आणि जिथे पोचल्यावर, किंवा जे जाणल्यावर मनुष्य सगळ्या शोकांपासून मुक्त होतो!” युधिष्ठिराने ने ब्राह्मणाची व्याख्या सांगितली.

“पण हे सगळे गुण तर शुद्रांमध्येही असू शकतात!” नहुषने पुन्हा प्रश्न विचारला.

“अवश्य...जर शुद्रात सत्य आणि धर्मनिष्ठा इत्यादी उपयुक्त लक्षणे असतील तर तो शुद्र नव्हे तर ब्राह्मण मानला जातो, आणि ज्या मनुष्यात ही लक्षणे नसतील त्याला शूद्रच म्हणायला हवे!” युधिष्ठिराने उत्तर दिले,

“हे, धर्मराज, जर एखाद्या व्यक्तीची जात फक्त त्याच्या कर्मावरच ठरत असल तर जन्मानुसार जाती ठरवल्या जाणे कितपत योग्य आहे?” नहुष युधिष्ठिराच्या उत्तरांनी जणू संतुष्टच होत नव्हता.

“हे सर्पराज, या विषयावर स्वयंभू मनु यांनी सविस्तर भाष्य केले आहे, की ज्या बालकाच्या जन्मानंतर त्याला वेदांचे ज्ञान दिले जात नाही ते कुठल्याही जातीत जन्माला आले तरी ते शूद्रच म्हणायला हवे. त्यामुळे असा नियम आहे की पित्याला आचार्य होऊन व मातेला सावित्री होऊन आपल्या नवजात बाळाला वेदांचे ज्ञान देणे अत्यंत आवश्यक आहे. इतकेच नव्हे सर्पराज, तर स्वयंभू मनु यांनी पुढे म्हटले आहे की मिश्र जातींच्या विवाहसंबंधांमधून जन्माला आलेल्या बालकांच्या जातीची ओळखल तोपर्यंत पटणे अशक्य आहे जोपर्यंत ती त्यांच्या जातीला साजेसे गुण दाखवायला लागत नाहीत. हे नहुष, धर्माचे अचूल आचरण करून व सत्याच्या मार्गाचा स्वीकार करून कुठलाही शुद्र ब्राह्मण होऊ शकतो आणि यांचे पालन न करणारा, पण ब्राह्मण म्हणून जन्माला आलेला कुणीही शुद्र होऊ शकतो !” युधिष्ठिराने नहुषला जातीची व्याख्या सांगितली.

वेदज्ञ नहुषाबरोबर ज्ञानाची चर्चा करताना युधिष्ठिरानेही त्याला धर्मासंबंधी अनेक प्रश्न विचारले. सगळ्यात पहिला प्रश्न असा होता, की मनुष्याला मोक्षप्राप्ती कशी होऊ शकते? याला उत्तर देताना नहुष म्हणाला “हे भरतवंशी, जो मनुष्य उचित दान धर्म करतो , सदैव गोड आणि सत्य बोलतो, तसेच कुठल्याही प्राण्याला कुठल्याही प्रकारे त्रास देत नाही, त्याला मोक्ष मिळणे निश्चित आहे!”


“हे सर्प-श्रेष्ठा, कृपा करून हे सांगा की दान आणि सत्य बोलणे यातील उत्कृष्ट धर्म कोणता? शिवाय सदाचार आणि कुठल्याही प्राण्याला इजा न करणे यात कुठल्या प्रकारचे आचरण निवडायला हवे?” या विषयात आणखी माहिती मिळवण्यात युधिष्ठिराला रस होता.


“हे कुंतीकुमारा, हे सगळेच गुण एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत. परिस्थितिनुसार आणि आवश्यकतेनुसार यांचे स्वरूप ठरते. याशिवाय हेही लक्षात ठेव राजा, की जिथे गोड पण असत्य बोलावे लागेल तेथे सदाचार बाजूला ठेवून सत्याला प्राधान्य द्यायला हवे. तसेच कुठल्याही प्राण्याच्या जीवाचे मोल हे कुठल्याही दानधर्मापेक्षा जास्त आहे. जर कुणाला इजा न करणे आणि दानधर्म किंवा सदाचार करणे यात निवड करायची असेल तेथे नेहेमीच कुणाला इजा न करण्याला प्राधान्य देणे हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे!” नहुषने मोक्षप्राप्तिचा मार्ग दाखवताना युधिष्ठिराला सांगितले.

यानंतर स्वर्गप्राप्तिविषयी अधिक जाणून घेण्यासाठी युधिष्ठिराने नहुषला जन्ममृत्युच्या चक्राविषयी विचारले. त्यावर उत्तर देताना नहुष म्हणाला “ हे युधिष्ठिरा, मी आधीच सांगितल्याप्रमाणे जो मानुष सदाचारी असेल, धर्माचरण करणारा असेल, आणि कुणाला इजा न करणारा असेल त्याला मोक्ष प्राप्ती होते. याच्या उलट आचरण करणारा मनुष्य, जो सदैव लोभ, क्रोध व कामवासनेने ग्रासलेला असेल , त्याला वारंवार मनुष्य किंवा इतर खालील स्तरावरच्या योनींमध्ये जन्म घेऊन संसारिक कष्ट भोगावे लागतात. सगळ्याच प्राण्यांमध्ये परमचेतनेच्या रुपात “आत्म्या”चा वास असतो. हा आत्मा भौतिक सुखांच्या प्राप्तीसाठी इंद्रियांचा उपयोग करत राहतो. म्हणूनच हे कुंतीकुमारा, इंद्रियांवर संयम ठेवणे हा आत्म्याच्या मुक्तीचा एकमेव मार्ग आहे!” 


“अति उत्तम। हे सर्परूपी नहुषा, मी तुझ्या ज्ञानाने अत्यंत प्रसन्न झालो आहे. कृपा करून मला आता हे सांगा की तुझ्यासारखा गुणी धर्मात्मा राजर्षीदेखील हे सगळे ज्ञान असताना आपल्या इंद्रियांवरचा ताबा कसा गमावून बसला, आणि अशा रीतीने शापित झाला?” युधिष्ठिराने विचारले.

“हे धर्मराज, हेच तर नामुष्याचे सर्वात मोठे दुर्भाग्य आहे, की सगळे माहित असूनही त्याला हे सत्य माहित नाही. समृद्धि आणि श्रीमंतीच्या झगमगाटाने मोठे मोठे विद्वानही आंधळे होऊन जातात. इन्द्रपदाच्या अहंकाराने मीही असाच मूर्खासारखा वागलो. पण तुला धन्यवाद कारण तू इथे येऊन माझ्याशी या ज्ञानाविषयी चर्चा केलीस. अगस्त्य ऋषींनी सांगितल्याप्रमे तुझ्याशी धर्मसंवाद केल्यामुळेच मला पुन्हा स्वर्गलोकात परतणे शक्य होते. तू आता माझ्या मुक्तीचा मार्ग मोकळा केलं आहेस, युधिष्ठिरा!” नहुष म्हणाला.

असे म्हणून सर्परूपी नहुषने भीमाला सोडून दिले. त्याच क्षणी ऋषी अगस्त्यांनी नहुषला दिलेल्या शापाचा अंत झाला. आपल्या मूळ स्वरुपात आल्यावर नहुषाने युधिष्ठिर आणि भीमाला आशीर्वाद दिले आणि आपले नश्वर शरीर त्यागून त्याने स्वर्गलोकाच्या दिशेने प्रस्थान केले.