SOCIAL MEDIA - श्राप की वरदान. सध्या शाळेत कश्या प्रकारचे निबंध लिहायला सांगतात माहिती नाही, पण जर माझ्या लहानपणी जर फेसबुक असतं तर ह्या विषयाचा निबंध नक्की लिहावा लागला असता. वापर करताना 


ज्या कलाकारांना कधीही लोकांपर्यंत पोहचायचं माध्यम मिळालं नसतं, त्या कलाकारांना अगदी फुकटात अनेक लोकांपर्यंत पोहचता आलं. अनेक लहान व्यावसायिकांना आपला धंदा social media च्या माध्यमातून वाढवता आला. 


जेव्हा जग लोकडोवन मध्ये होतं तेम्हा ह्या social media मुळे अनेक लोक आपलं पोट भरू शकले आणि ह्याच social मीडीया ने आपलं मनोरंजन पण केलं. 


पण ह्याच social media मुळे अनेक लोकं खास करून teenagers एका virtual जगात बुडून गेले आहेत. टिकटॉक बॅन झाल्यावर किती लोकं रडले आणि काहींनी तर अगदी आत्महत्या पण केली अश्या काही बातम्या आल्या होत्या. 


आपल्याला माहितीच आहे कोणतीच गोष्ट वाईट नसते, त्याचा वापर कसा होतो हे महत्वाचं आहे, आणि म्हणूनच social media चा वापर करताना balance ठेवणं खूप आवश्यक आहे. 


Social media चा वापर जाहिरात करायला असा सुरु झाला, कुठल्या ब्रॅण्ड्स नी ह्याचा कसा वापर केला, social media consultant म्हणजे नक्की काय ?

आता पुढे काय, अश्या सगळ्या विषयांवर गप्पा केल्या आहेत इन्स्पिरेशन कट्टा च्या ४३व्या भागात शार्दूल कदम ह्याच्याशी. 


#marathipodcast #marathi #socialmedia 



--- Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message