फेब्रुवारी महिना, गुलाबी थंडी आणि उद्यावर आलेला valentine's day.. छान रोमँटिक गाणे आठवतात आहे ना? 

पहिलं प्रेम आठवतं आहे का?

आपले किंवा मित्रांचे प्रेमभंग आठवतात आहे का?

अश्यातच पुढे अनेकांचे प्रेमविवाह पण झाले असतील आणि काहींचे विवाहानंतर प्रेमही..

लग्न होत, हनिमून होतं, पाहिलं वर्ष छान उत्साहात जातात, आणि मग हळू हळू बारीक सारीक गोष्टी कळायला लागतात. 

रोज दारू पिण्याची अगदी भयंकर सवय असो किंवा ओला टॉवेल गाडीवर ठेवायची छोटी पण irritating सवय. 

खटके उडायला सुरूवत होते, मग त्याचं रूपांतर भांडणात आणि कधी कधी घटास्पोटात पण..


१० वर्षांच्या relationship नंतर माझा घटस्फोट होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.

माझ्या जवळच्या नात्यातील अजून एकाचं लग्नाला १२ वर्ष झाल्यावर घटस्फोट झाला.

अनेक मित्रं मैत्रीच्या कडे अशी परिष्टित असल्याचे ऐकिवात आहे..

का होत आहे असं?

Mid life divorce ची संख्या वाढते आहे का?

पस्तिशी येता येताच married life एकसंध आणि बोरिंग व्यायला लागली आहे का?

काय कारण आहेत ह्याची?

आणि हे बदलायच असेल तर काय उपाय आहे? 

ह्या एका महत्त्वाच्या विषयावर हा valentine's day special episode..

--- Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message