आजची आपली पाहुणी आहे अपूर्वा जोशी. 


अपूर्वा ही एक फोरेन्सिक अकाऊंटंट आहे. 


तिचं काम आहे समाजातील उचभ्रू, पॉवरफुल, श्रीमंत आणि हुशार अश्या लोकांनी केलेले आर्थिक घोटाळे शोधून काढणे, आणि त्याचे न्यायालयात मांडता येतील असे पुरावे सादर करणे.  


हे सगळं  netflix वर खूप ग्लॅमरस वाटत असेल, पण खऱ्या आयुष्यात प्रचंड मोठ्या ढिगाऱ्यातून, म्हणजे आता अर्थात डिजिटल ढिगाऱ्यातून सुई शोधण्यासारखं हे काम खूप मेहनतीचं, प्रचंड चिकाटिच आणि अतिशय चौकस बुद्धीच आहे. 


अश्या ह्या क्षेत्रात एका मुलींनी येणं खुपच प्रेरणादायी आहे. 


घोटाळे शोधून काढण्याबरोबरच ते होऊच नये ह्या साठी प्रेव्हेंटिव्ह आणि शैक्षणिक कामही अपूर्वा आणि तिची संस्था करते. 


अश्या क्षेत्रात काम करायचे फायदे , challenges काय ?


कोणते कौशल्य आणि mindset लागतो ?


मुलींनी अश्या क्षेत्रात काम करावे का?


तिच्या कारकिर्दीतल्या इंटरेस्टिंग केसेस बद्दल माहिती 


अश्या अनेक विषयांवर गप्पा केल्या आहेत डॉ अपूर्वा जोशी हिच्याशी, इन्स्पिरेशन कट्टाच्या ३७व्या भागात. 


त्यांची website आहे - https://riskprolearning.com/


त्यांनी suggest केलेला पुस्तकं इथे मिळेल  -  https://amzn.to/3oZClAR ( इंग्लिश )  ; https://amzn.to/3vuOvEv ( मराठी अनुवाद) 


आमची website आहे - www.mipodcaster.com 





--- Send in a voice message: https://anchor.fm/nachiket-satish-kshire/message