विषय - "उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा" - सुरेश हावरे या पुस्तकामधून "कार्यारंभ" प्रकरणाचे अभिवाचन
सादरकर्ती - द्वितीया सोनावणे
पुस्तकाचे नाव - उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा 
लेखक - सुरेश हावरे
प्रकाशन - रोहन प्रकाशन
केवळ पैशाचंच पाठबळ असल्यास यशस्वीपणे उद्योग करता येतो या जनमानसात सर्वसाधारणपणे असलेल्या समजुतीलाच हावरे यांनी छेद दिला आहे. भांडवलासाठी पैसा बाहेरूनही उभा करता येतो, किंबहुना तो बाहेरूनच उभा करायचा असतो. मात्र व्यवसाय करण्यासाठी मुख्य भांडवल तुमच्यापाशी आवर्जून हवं असतं ते दुर्दम्य इच्छाशक्तीचं, आत्मविश्वासाचं व व्यावसायिक वृत्तीचं! हा मूलभूत मंत्र आत्मसात करण्यासाठी आणि पुढे प्रत्यक्षात व्यवसाय वृध्दिंगत करण्यासाठी लागणार्‍या घटकांची चर्चा ते विस्तृतपणे पुस्तकातून करतात. उद्योगाची उभारणी कशी करावी, आखणी व अंमलबजावणी, ब्रँडिंग, रिलेशन, उद्योगाचं बजेट, प्लॅनिंग व ग्रोथ कशी करावी असे महत्त्वाचे विषय त्यांनी यात हाताळले आहेत. जो स्वत:च्या अनुभवातून शिकतो, तो हुशार माणूस समजला जातो पण जो इतरांच्या अनुभवातून शिकतो तो खरा चाणाक्ष माणूस. त्यामुळे नवउद्योजकांसाठी किंवा उद्योगात प्रगती साधायची इच्छा असणार्‍या तरुणांसाठी हे अनुभवाचे बोल अत्यंत उपयोगी पडतील. ‘उद्योजक हा राष्ट्राची संपत्ती निर्माण करणारा मुख्य घटक असतो’ असं मत हावरे आत्मविश्वासपूर्वक व्यक्त करतात. अनेक वर्षं यशस्वीपणे बांधकाम क्षेत्रातील उद्योगधुरा सांभाळणार्‍या हावरे यांचे अनुभवाचे बोल नवउद्योजकांसाठी नक्कीच प्रेरक व मार्गदर्शक ठरतील

पुस्तक विकत घेण्यासाठी - www.granthpremi.com

#bookreview #marathibooks #marathiauthors #granthpremi #SureshHawre #UdyogTumchaPaisaDusryacha
#उद्योगतुमचापैसादुसऱ्याचा #सुरेशहावरे #ग्रंथप्रेमी #मराठीपुस्तके #अभिवाचन #मराठीलेखक #मराठीलेखक 

#neemtreelabs,#bookreview,#marathibooks,#marathiauthors,#granthpremi,#SureshHawre,#UdyogTumchaPaisaDusryacha,#उद्योगतुमचापैसादुसऱ्याचा,#सुरेशहावरे,#ग्रंथप्रेमी,#मराठीपुस्तके,#अभिवाचन,#मराठीलेखक,