Sourav Ganguly vs Virat Kohli, Nitish Rana vs Hrithik Shokeen
Coffee, Cricket Aani Barach KaahiApril 18, 202300:10:409.8 MB

Sourav Ganguly vs Virat Kohli, Nitish Rana vs Hrithik Shokeen

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या म्हणीनुसार संघामध्ये १५ खेळाडू असताना प्रत्येकाचं सगळ्यांशी पटेलच असं नाही. पण जमवून घेणं प्रत्येकाचं काम आहे. गेल्या आठवड्यात IPL मध्ये सौरव गांगुली-विराट कोहली आणि नितिश राणा-रितिक शोकिनमध्ये जे घडलं त्यावरून खेळाडूंमध्ये किती खुन्नस असते याची झलक बघायला मिळाली. त्याचप्रमाणे दिल्ली कॅपिटल्स स्पर्धा अजून ४० दिवस शिल्लक असतानाच पुढच्या सीझनकडे डोळे लावून बसले असावेत असं वाटू लागलं आहे. हे आणि गेल्या आठवड्यातल्या घडामोडी घेऊन येत आहेत साप्ताहिक सीसीबीकेमध्ये अमोल क-हाडकर आणि आदित्य जोशी.