Leben – Marathi edition स्वीकृत एक अतिशय संवेदनशील माणूस यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतून आणि प्रत्यक्षातून जातो त्याची जर्मन भाषेतली गोष्ट आहे लेबेन आणि लेखक आहेत डाविड वाग्नर. त्याचा डॉ. सुनंदा महाजन यांनी केलेला तितकाच संवेदनशील मराठी अनुवाद काँटिनेंटल प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे.  हा अनुवाद जर्मन भाषेतून थेट मराठी भाषेत केला आहे हे विशेष. वर्षानुवर्षे आपल्यासोबत असलेला आजार, प्रत्यारोपणाच्या कल्पनेने आणि प्रत्यक्षाने आलेली मानसिक भावनिक आंदोलने, आशा-निराशा, एकटेपण, रुग्णांचीच सोबत..... या सगळ्याकडे बघण्याची जर्मन दृष्टी आणि तिचं तंतोतंत मराठीकरण. वाचकांना एक अगदी वेगळा अनुभव देणारं खिळवून ठेवणारं पुस्तक – स्वीकृत. अनुवादक सुनंदा महाजन या जर्मन भाषा तज्ज्ञ आणि अनुभवी, जागरूक अनुवादक. त्यांनी केलेला अनुवाद हा भाषांतरकारांसाठी एक वस्तुपाठ आहे. काँटिनेंटल प्रकाशनाच्या देवयानी अभ्यंकरा यांनी हे पुस्तक निवडण्यामागची कारणंही समजून घेण्यासारखी आहेत. विदुला टोकेकर आणि उज्ज्वला बर्वे यांनी त्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून एक उत्कृष्ट अनुवाद कसा आकाराला येतो हे ऐकायला वाचक-श्रोत्यांना नक्की आवडेल. स्वीकृतची मराठी  छापील आवृत्ती इथे आणि इथे उपलब्ध आहे. मूळ जर्मन पुस्तकाची छापील आवृत्ती इथे आणि इथे  उपलब्ध आहे.

तुम्ही गेल्या वर्षात कोणते अनुवाद वाचले ते आम्हाला कळवण्यासाठी आणि अनुस्वादसाठी अनुवादित पुस्तकं सुचवण्यासाठी आम्हाला anuswaad@gmail.com वर मेल करा.