'गांधीविचार' याचे अनेक पैलू आहेत, ७२ वर्षांनतरही त्यातल्या अनेकांवर अजूनही नव्याने संशोधन, विचार होत आहे, आणि त्यातून आजच्या काळातील प्रश्नांच्या उत्तरांच्या नव्या शक्यताही समोर येऊ शकतात. गांधीविचाराला कोणत्याही कप्प्यात टाकण्याअगोदर त्यातले काही नीट समजावून तरी घेऊया. स्थलांतर, खादी, धर्म आणि राजकारण हे विषय आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. खादी हे तर क्रांतीचे प्रतीक मानले आहे. याच तीन विषयांवर सेज प्रकाशनाने इंग्रजीत प्रकाशित केलेल्या तीन पुस्तकांच्या मराठी आवृत्त्या सेज भाषा तर्फे प्रसिद्ध झाल्या आहेत. इंग्रजी संशोधनपर पुस्तकांचा मराठी अनुवाद या निमित्ताने समोर ठेवत आहोत. अस्सल भारतीय विषयावर इंग्रजीत झालेल्या संशोधनाचे मराठी अनुवाद प्रस्तुत आहेत का, भारतीय भाषांसाठी जड लेखनाचे सुलभीकरण करावे का अशा काही प्रश्नांचाही विचार या भागात तुम्हाला ऐकायला मिळेल. ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि गांधीविचाराचे अभ्यासक श्री. जयदेव डोळे यांच्याशी वार्तालाप केला आहे उज्ज्वला बर्वे आणि विदुला टोकेकर यांनी.

या भागात तुम्ही पुढील पुस्तकांबद्दल ऐकणार आहात - 

अटलांटिक गांधी, मूळ लेखक नलिनी नटराजन, अनुवादक विजया देव. 

खादी – गांधींच्या क्रांतीचे महाप्रतीक, मूळ लेखक पीटर गोंसाल्विस, अनुवादक अन्योक्ती वाडेकर. 

गांधी आणि अली बंधू – एका मैत्रीचे चरित्र, मूळ लेखक राखहरि चटर्जी, अनुवादक तृप्ती कुलकर्णी.

तुम्ही सध्या कोणते अनुवाद वाचताय किंवा नुकतेच वाचून संपवले, किंंवा कोणत्या अनुवादित पुस्तकांबद्दल अनुस्वाद मध्ये ऐकायला आवडेल हे आम्हाला anuswaad@gmail.com वर जरूर कळवा.