Anuswad Episode 3 When We Were Orphans Marathi अनुस्वाद भाग ३ व्हेन वुई वेअर ऑर्फन्स मराठी

Anuswad Episode 3 When We Were Orphans Marathi अनुस्वाद भाग ३ व्हेन वुई वेअर ऑर्फन्स मराठी

When We Were Orphans by Sir Kazuo Ishiguro – Marathi Translation

नोबेल पुरस्कारप्राप्त लेखक काझुओ इशिगुरो यांची व्हेन वुई वेअर ऑर्फन्स ही गाजलेली साहित्यकृती. बुकर पुरस्कारासाठी नामांकन मिळालेली ही कादंबरी युद्धाची गोष्ट सांगते – मनातल्या आणि बाहेरच्या. महायुद्धाच्या मोठ्या पटावरची ही कथा माणसांच्या मनातल्या ममत्व, पोरकेपण, असहायता, निश्चय, मैत्री, अशा तरल भावनांनाही हळुवार स्पर्श करते. ही कथा अनोळखी प्रदेशात, अनोळखी काळात, अनोळखी माणसांच्या आयुष्यात घडत असली, तरी जगभरातील वाचकांना ती अगदी आपलीच वाटते. ४० भाषांमध्ये समीक्षकांची आणि वाचकांची आवडती कादंबरी मराठीत आणली आहे वेस्टलँड अमेझॉनने, त्यांच्या एका या उपक्रमाअंतर्गत. मराठीत अतिशय सुंदर अनुवाद केला आहे सुश्रुत कुलकर्णीने (https://www.linkedin.com/in/sushrut-kulkarni-9a955712/ ) आणि अनुवादाचं संपादन केलं आहे सुवर्णा अभ्यंकरने (https://www.linkedin.com/in/suvarna-abhyankar-865756b7/) . अनुस्वादच्या या भागात उज्ज्वला आणि विदुला या दोघांशी संवाद साधत आहेत.

या भागात तुम्ही या पुस्तकाबद्दल तर ऐकालच, पण अनुवाद प्रक्रियेबद्दल सुद्धा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर झालेली चर्चा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि उपयुक्तही वाटेल.

व्हेन वुई वेअर ऑर्फन्स मराठी ची   छापील आवृत्ती आणि ई-बुक आवृत्ती इथे उपलब्ध आहे.

मूळ इंग्रजी पुस्तक print edition  ebook edition and audio edition   इथे उपलब्ध आहे