द गर्ल इन रूम 105 हे प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांचं गाजलेलं आणि थोड्याशा वेगळ्या म्हणजे रहस्यकथेच्या अंगाने जाणारं पुस्तक. याचा मराठी अनुवाद केला आहे सुवर्णा अभ्यंकर यांनी. रहस्यकथा हा साहित्यप्रकार हाताळताना त्यातलं रहस्य शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी अनुवाद करताना अनुवादकाला काय काळजी घ्यावी लागते, आजच्या तरुणाईच्या भाषेत सहज येणारे इंग्रजी आणि इतर भाषांमधले शब्द त्यातली संवादात्मकता आणि सहजता न घालवता भाषांतरित करण्याची प्रक्रिया कशी असते त्यासाठी कोणत्या गोष्टींची मदत होते हे समजून घेणं मराठी वाचकांसाठी निश्चितच रंजक ठरेल. या आणि अशा इतरही गोष्टींवर सुवर्णा अभ्यंकर यांच्याशी संवाद साधला आहे उज्जवला बर्वे आणि विदुला टोकेकर यांनी. 

तुम्ही सध्या कोणते अनुवाद वाचताय किंवा नुकतेच वाचून संपवले, किंवा कोणत्या अनुवादित पुस्तकांबद्दल अनुस्वाद मध्ये ऐकायला आवडेल हे आम्हाला anuswaad@gmail.com वर जरूर कळवा.

The Girl in Room 105 is a famous and different book by celebrated writer Chetan Bhagat which comes under the genre of suspense thriller. It is translated into Marathi by Suvarna Abhyankar. How careful the translator has to be while translation suspense thrillers to make sure that the suspense remains the suspense till the very end, what is the process of translation the English and Hindi words which are used so often by the young generation into Marathi without losing the spontaneity and natural flow of the language and how it is done will be very interesting to know for Marathi readers. Ujjwala Barve and Vidula Tokekar are in conversation with Suvarna Abhyankar on these and many more interesting points in this episode. 

Do write to tell us which translations you read recently and which ones you would like to hear about in Anuswad. Write to us - anuswad@gmail.com