A to Z Housing Solutions - Trailer Episode
A to Z Housing SolutionsDecember 28, 202200:01:18

A to Z Housing Solutions - Trailer Episode

A to Z Housing Solutions is the official Marathi Podcast of Pune-based firm Society Plus, having a legacy of over three decades. 

वाढत्या शहरीकरणामुळे घरांची गरज मोठ्या प्रमाणात वाढली. गृहनिर्माण सोसायट्या विकसित झाल्या. जसजशी सोसायट्यांची संख्या वाढू लागली तसतसे त्यांच्या व्यवस्थापनाचे प्रश्न उपस्थित होऊ लागले. काळ पुढे सरकत गेला तशी या सोसायट्यांची, त्यातल्या घरांची रचना कालबाह्य ठरू लागली आणि पुनर्विकासाचे प्रश्न भेडसावू लागले. सोसायटीशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी चांगल्या प्रक्रिया आकार घेण्याची आवश्यकता निर्माण झाली. कायदेशीर अभ्यास, सोसायट्यांच्या प्रक्रियांची उत्तम जाण या ज्ञानाची गरज निर्माण झाली. याच्यातूनच आकाराला आलेली संस्था म्हणजे सोसायटी प्लस. सोसायटी विषयीच्या प्रश्नांची आणि शंकांची उत्तरे मिळविण्यासाठी वेळोवेळी तज्ज्ञांची भेट घेण्याची सवड आज आपल्यापैकी कुणालाही मिळत नाही. मग करायचं काय? याचं उत्तर देण्यासाठी सोसायटी प्लस सुरू करत आहे ए टू झेड हाऊसिंग सोल्यूशन्स हा पॉडकास्ट. तुम्ही हा पॉडकास्ट नक्की ऐका, तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्की मिळतील.

A to Z Housing Solutions Podcast
Voice Over Artist of Trailer Episode: Onkar Thorat
Produced by: Society Plus, Pune (India)
Concept & Execution: MediaNext Infoprocessors Pvt. Ltd. & Sounds Great NM Audio Solutions LLP, Pune (India) 

Contact No: 8956260730
Email: info@societyplus.co.in
Website: www.societyplus.co.in