देशातील बाजारात गव्हाच्या दरात पुन्हा वाढ दिसून येत आहे. सरकारने निर्यातबंदी आणि स्टाॅक लिमिट लावल्यानंतर देशात गव्हाचे भाव स्थिर दिसत होते. त्यातच सरकारने स्टाॅकमधील गहू विकण्यासही सुरुवात केली. यामुळे खुल्या बाजारात गव्हाचे भाव स्थिर दिसू शकतात, अशी आशा होती. पण बाजारात गव्हाच्या दरात वाढ झाली. मग असं का घडतंय? गव्हाचे भाव कितीपर्यंत वाढले? पुढील काळात दरातील वाढ टिकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.


