देशातील बाजारात सध्या तुरीच्या दरातील तेजी चांगलीच चर्चेत आहे. तुरीच्या भावाने यंदा सरकारची झोपच उडवली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यंदा तुरीचे उत्पादन कमी होऊन दरात मोठी तेजी आली. सरकारने तुरीवर मागील आठवड्यात स्टाॅक लिमटही लावले. पण तुरीच्या दरातील तेजी कमी व्हायचे नावचं घेईना. मग सध्या तुरीला काय भाव मिळत आहे? तुरीचे भाव पुढील काळात कसे राहू शकतात? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.


