यंदा हळद पिकासाठी पोषक वातावरण असल्याने उत्पादन वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. हळदीची लागवडही यंदा मागील वर्षीपेक्षा जवळपास ६ टक्क्यांनी वाढली आहे. तसेच पोषक वातावरण असल्याने उत्पादकता अधिक येण्याची शक्यता आहे. पण यंदा खरंच हळद उत्पादनात वाढ होईल? हळदीला सध्या काय दर मिळत आहे? हंगामात हळदीचे दर टिकतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


