देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये तुरीच्या दरात पुन्हा सुधारणा झाली आहे. परंतु बाजारातील आवक मात्र कमीच दिसत आहे. आयातही मर्यादीत होत आहे. आफ्रिकेतील देशांमधील तूर आता काढणीला आलीय. त्यामुळे पुढील महिन्यापासून आयात वाढण्याची शक्यता आहे. मग या काळात तुरीचा बाजार कसा राहील? नव्या हंगामात तुरीला काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


