देशातील बाजारात तुरीचे दर चांगलेच तेजीत आहेत. बाजार समित्यांमध्ये सध्याचा काळ तसा आवकेचा आहे. पण सध्याची आवक खूपच आहे. त्यातच लग्न सराईमुळे तुरीला चांगला उठाव मिळतोय. तर सरकार बाजारात हस्तक्षेप करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग या काळात तुरीचा बाजार कसा राहू शकतो? सध्या तुरीला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.


