देशातील बाजारातील चर्चा सध्या तुरीभोवती फिरत आहे. यंदाही भाव दबावात ठेवण्याच्या सरकारच्या मनसुब्यावर यंदा तुरीने पाणी फेरले. सरकारने व्यापारी, स्टाॅकिस्ट, प्रक्रियादार आणि आयातदारांवर दबाव वाढवला. तरीही तुरीच्या दरातील तेजी कमी झाली नाही. त्यामुळे सरकार स्वतः तुरीची आयात करू शकते, असा इशारा अन्न सचिवांनी दिला होता. मग सरकारला खरचं स्वस्त तूर आयात करता येईल का? सरकारला स्वस्त तूर मिळू शकेल का? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.


