काही बाजारांमध्ये तुरीच्या भावाने ११ हजारांचा टप्पा गाठला होता. तर खुल्या बाजारात तूर डाळीचे भाव १५० रुपयांवर पोचले होते. निवडणुकीच्या तोंडावर तुरीच्या भावातील तेजी सरकारला परवडणारी नव्हती. त्यामुळे सरकारने तुरीवर स्टाॅक लिमिट लावले, असे व्यापारी सांगत आहेत. पण या स्टाॅक लिमिटचा तुरीच्या भावावर काही परिणाम होतोय का? तुरीचे भाव सध्या काय आहेत? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.


