मागील हंगामात शेतीमाल बाजारात कडधान्यांचे दर दबावात होते. मात्र यंदा कडधान्यांचे दरही वाढताना दिसातात. कडधान्यातील तेजीचं नेतृत्व तूर करताना दिसत आहे. तुरीचे दर तेजीत असल्याने महागाई वाढत असल्याची ओरड सध्या केली जात आहे. पण शेतकऱ्यांचा विचार केला तुरीतील तेजीत तेवढी फायदेशीर ठरताना दिसत नाही. मग शेतकऱ्यांसाठी तुरीचं गणित कसं आहे? सध्या तुरीला काय भाव मिळतोय? तुरीच्या दरातील तेजी किती दिवस टिकेल? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.


