यंदा देशातील तुरीचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे सरकारने तूर आयातीसाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. यंदाही गेल्यावर्षीऐवढी तूर आयात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आफ्रिकेतील देशांमधूनच जास्त तूर आयात केली जाते. पण आता तूर उत्पादकांना दिलासा देणारी बातमी आफ्रिकेतून येत आहे. मग काय आहे ही बातमी? याचा देशातील तूर बाजारावर काय परिणाम होईल? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


