Tur Market: कमी उत्पादनामुळे तुरीचा तुटवडा | Agrowon
Shet MarketMarch 17, 202300:05:20

Tur Market: कमी उत्पादनामुळे तुरीचा तुटवडा | Agrowon

मागील हंगामात तुरीला हमीभावापेक्षा कमी दर मिळल्याने शेतकऱ्यांनी लागवड कमी केली. त्यातच पावसामुळे उत्पादनात घट आली. त्यामुळे बाजारात सध्या व्यापाऱ्यांना पुरेशी तूर मिळत नाही. त्यामुळे तूर डाळीचे दरही वाढत आहेत. या दरवाढीचा आधार तुरीच्या बाजाराला मिळेल का? तुरीचे भाव काय राहू शकतात? सध्या तुरीला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.