देशातील बाजारात पुढील काळात तुरीची आवक वाढणार आहे. देशातील सध्या तुरीला चांगले दर मिळत आहेत. आयात पडतळ असल्याने म्यानमारमधून तुरीची आयात होऊ शकते. त्यातच सरकारने स्टाॅकिस्टना नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. तुरीचे दर जास्त वाढल्यास सरकार बाजारात हस्तक्षेप करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मग या काळात तुरीचा बाजार कसा राहू शकतो? यंदा तुरीला काय दर मिळू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


