अमेरिकेच्या कृषी विभागाने यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा ३५५ लाख टनांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला. तर जागतिक सोयाबीन गाळप एक हजार लाख टनाने वाढेल तसेच शिल्लक साठाही गेल्यावर्षीपेक्षा ७ लाख टनांनी अधिक राहील, असंही म्हटलंय. तसंच पामतेलाचे दरही मागील काही दिवसांपासून नरमले आहेत. मग याचा सोयाबीन बाजारावर काय परिणाम झाला? देशातील सोयाबीन बाजार कसा राहीला? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.


