ब्राझीलमध्ये यंदा विक्रमी सोयाबीन उत्पादन झाले. येथील उद्योगांच्या मते ब्राझीलचं उत्पादन १ हजार ५६० लाख टनांवर पोचलं. यामुळे स्वस्त सोयाबीन बाजारात आले. ब्राझीलचे सोयाबीन स्वस्त असल्याने यंदा निर्यातही विक्रमी पातळीवर पोचण्याचा अंदाज आहे. मग ब्राझीलच्या सोयाबीन निर्यातीचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? सध्या सोयाबीनचा बाजार कसा आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.


