ब्राझीलमधील सोयाबीन उत्पादन विक्रमी पातळीवर पोचल्यानं सोयाबीन बाजारातील समिकरणच बदललं. ब्राझीलचं सोयाबीन बाजारात आल्याबरोबर दरावर दबाव आला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडच्या दरात मोठी घट मागच्या माहिनाभरात पाहायला मिळाली. ब्राझील यंदा विक्रमी सोयाबीन निर्यात आणि गाळप करण्याचीही शक्यता आहे. मग सध्या ब्राझीलची सोयाबीन निर्यात कशी सुरु आहे? सोयाबीन बाजाराची स्थिती पुढील काळात कशी राहील? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.


