सर्जा-राजाला नदीवर नेऊन कुणी आंघोळ घालत असेल, कुणी सर्जा-राजा साज बाहेर काढला असला. त्याची साफसफाई सुरू असेल. तर कुठं हिरवेगार माळरानात चराईला सोडून चककणाऱ्या त्यांच्या शिंगाकडे टक लावून कुणी बसलेलं असेल. पोळा सणाची धामधूम गावोगावी सुरू झाली असेल. पोळा सण बैलाच्या ऋणातून उतराई होण्याचा छोटासा प्रयत्न असतोय. याच पोळा सणाबद्दल आज तुमच्याशी थोडं बोलावं म्हणलं