सध्या कांद्याचे भाव दबावात असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच नाशिक जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंदची हाक दिली. त्यामुळे शेतकऱ्यांची आणखी गोची झाली. मग याचा कांदा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? सध्या कांद्याला काय भाव मिळतोय? पुढील काळात कांदा बाजार कसा राहू शकतो? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.