जागतिक पातळीवर काबुली हरभऱ्याला सध्या चांगली मागणी आहे. त्यामुळे देशातून काबुली निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढली. देशात काबुली हरभरा पिकावर बदलते वातावरण आणि पावसाचा परिणाम झाला. यंदा देशातील उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. मग पुढील काळात बाजारातील आवक वाढल्यानंतर दर कसे राहतील? निर्यात टिकून राहील का? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.


