कापसाचे भाव जसे रुईच्या दरावर अवलंबून असतात तसंच सरकीच्या दराचाही परिणाम होत असतो. कापसामध्ये फक्त ३५ टक्क्यांपर्यंत रुई असते. तर ६५ टक्क्यांपर्यंत सरकी असते. त्यामुळं सरकीच्या दरासोबतही कापसाचे भाव बदलत असतात. मग सध्या सरकीचा भाव काय आहे? सरकी दराचा कापूस बाजाराला आधार मिळतो का? कापूस दर वाढतील का? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


