आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात आजही काहीशी घट झाली. मात्र देशांतर्गत बाजारात कापूस दरातील घट आज थांबली. आज अनेक बाजारांमध्ये कापसाच्या दरात सुधारणा पाहयाला मिळाली. पण कापूस दरातील चढ-उतार पुढील महिनाभर कायम राहू शकतात. मग या स्थितीत कापसाला काय दर मिळू शकतो? आज कापसाच्या दरात किती सुधारणा झाली? याची माहिती तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळेल.


