देशात नाफेडकडून हरभऱ्याची खरेदी वेगाने सुरु आहे. त्यातच मागील हंगामातील हरभरा साठाही मोठ्या प्रमाणात आहे. खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दर असल्याने नाफेडला हरभरा विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. रमजान आणि लग्नसराईचा काळ संपल्यानंतर हरभऱ्याला उठाव कमी राहण्याची शक्यता आहे. मग आगामी काळात हरभरा बाजार कसा राहील? सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? नाफेडने आतापर्यंत किती हरभरा खरेदी केला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.


