नाफेडची हरभरा खरेदी बहुतांशी ठिकाणी बंद झाली. २७ जूनपर्यंत नाफेडने देशात २३ लाख ४५ हजार टन हरभरा खरेदी केली. यंदा मध्य प्रदेशात सर्वाधिक हरभरा खरेदी झाली. त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. त्यातच नाफेडने हरभरा विक्रीचा निर्णय घेतला. मग नाफेडची हरभरा विक्री कधीपासून सुरु होईल? कोणत्या राज्यांमध्ये नाफेड हरभरा विकणार आहे? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.


