देशात सध्या हरभऱ्याचे भाव हमीभावापेक्षा कमीच आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकरी नाफेडला विक्री करण्याचं उद्दीष्ट बाळगून आहे. शेतकऱ्यांनी नाफेडला हरभरा देण्यासाठी माल मागं ठेवला. यामुळं खुल्या बाजारातील हरभरा आवक काहीशी कमी दिसते. दुसरीकडे नाफेडची खरेदीही ७ लाख टनांवर पोचली. पण हरभरा दर मात्र दबावातच का आहेत? सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट पाॅडकास्टमधून मिळेल.


