यंदा हरभऱ्याचे उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगत असले तरी सरकारने मात्र यंदा विक्रमी उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. देशात यंदा १३६ लाख टन हरभरा उत्पादन होईल, असा सरकारचा अंदाज आहे. नाफेडने आतापर्यंत मोठ्या प्रमाणात हरभरा खरेदी करूनही दर दबावात आहेत. बाजारात हरभरा दर दबावात असल्याने निर्यातही वाढली. मग आतापर्यंत देशातून किती निर्यात झाली? सध्या हरभऱ्याला काय भाव मिळतोय? याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट बुलेटीनमधून मिळेल.


