'लागिरं झालं जी' या मालिकेतील 'भय्यासाहेब' नावाचं खलनायकी पात्र साकारणा-या किरणची नेहमीच पसंती राहिलीय ती व्हिलनच्या भूमिकेसाठी. ज्येष्ठ अभिनेते निळूफुले हे त्याचे आवडते खलनायक. नेहमीच शाळेत बॅकबेंचर असणा-या किरणने अभिनयाच्या क्षेत्रात मात्र फ्रंटलाईन अभिनेत्यांच्या रांगेत आपलं स्थान पक्कं केलं ते देवमाणूस मालिकेत डॉ.अजित कुमार देव ही मध्यवर्ती भूमिका साकारून. आता ही मालिका पुन्हा भेटीला येतेय. तेव्हा यानिमित्ताने किरण गायकवाडची ही दिलखुलास मुलाखत ऐका सकाळ unplugged कार्यक्रमात फक्त सकाळ पॉडकास्टवर.


