'सत्या','रंगीला','सरकार','भूत','कम्पनी' असे वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे बनवणारे राम गोपाल वर्मा आता 'लडकी: गर्ल ड्रॅगन' हा सिनेमा घेऊन आपल्या भेटीस येत आहेत. १५ जुलै रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे चीनी भाषेतही हा सिनेमा डब करण्यात आला असून चीनमधील ४० हजार स्क्रीनवर प्रदर्शित केला जाणार आहे. चीननं यासाठी राम गोपाल वर्मांशी मैत्रीचा हात मिळवल्याचं त्यांनी सांगितलं. या सिनेमाच्या निमित्तानं सकाळ UNPLUGGED ला दिलेल्या मुलाखतीत राम गोपाल वर्मा यांनी राजकारण,ट्रोलिंग,साउथ सिनेमावरुन रंगलेला वाद अशा अनेक गोष्टींवर मोकळेपणाने आपली मतं मांडली आहेत.


