गेल्या पंधरा वर्षांपासून'तारक मेहता का उल्टा चश्मा'ही मालिका प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे.विशेष म्हणजे या मालिकेतील आत्माराम तुकाराम भिडे ही व्यक्तिरेखा अधिक लोकप्रिय असलेली पाहायला मिळते.मात्र,ही भूमिका साकारणारे मंदार चांदवडकर कोण आहेत?त्यांचा अभिनय क्षेत्रातला प्रवास कसा राहिला आहे?भिडेंची भूमिका साकारणाऱ्या चांदवडकर यांचं व्यक्तिगत आयुष्य कसं आहे? सेटवर पडद्यामागचं वातावरण कसं असतं? अभिनय क्षेत्रात येणाऱ्या नवख्या युवकांनी काय काळजी घ्यावी? या व अशा अनेक प्रश्नांवर त्यांच्याशी खास बातचीत केली आहे प्रतिनिधी गौरव मालक यांनी.


