मूर्ख माकड

मूर्ख माकड

एका नगराजवळ कोण्या वैश्याच्या पुत्राने घनदाट झाडांमध्ये मंदिर उभारायला सुरूवात केली.तिथे काम करणारे जे कारागीर होते. ते दुपारच्या वेळी भोजन करण्यासाठी नगरात जात असत. एके दिवशी माकडांची एक टोळी फिरतफिरत तिथे आली. तिथे एका कारागिराने अर्धवट चिरलेल्या लाकडाच्या खांबात खैराची खुंटी ठोकून तो उभा करून ठेवला होता. त्याच वेळी ती माकडे झाडावर, तसेच त्या लाकडाच्या आजूबाजूला खेळू लागली. त्यांच्यातील एक चळवळ्या माकड त्या अर्धवट चिरलेल्या खांबावर बसलं आणि हाताने ती खुंटी हलवून काढू लागलं. ती खुंटी उखडून काढल्यावर त्या भेगेत त्याचं शेपूट अडकलं ज्यामुळे ते मारून गेलं. म्हणूनच म्हणतात, 'निरुपयोगी कामाचा विचार करून काय फायदा!' Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

एका नगराजवळ कोण्या वैश्याच्या पुत्राने घनदाट झाडांमध्ये मंदिर उभारायला सुरूवात केली.तिथे काम करणारे जे कारागीर होते. ते दुपारच्या वेळी भोजन करण्यासाठी नगरात जात असत. एके दिवशी माकडांची एक टोळी फिरतफिरत तिथे आली. तिथे एका कारागिराने अर्धवट चिरलेल्या लाकडाच्या खांबात खैराची खुंटी ठोकून तो उभा करून ठेवला होता. त्याच वेळी ती माकडे झाडावर, तसेच त्या लाकडाच्या आजूबाजूला खेळू लागली. त्यांच्यातील एक चळवळ्या माकड त्या अर्धवट चिरलेल्या खांबावर बसलं आणि हाताने ती खुंटी हलवून काढू लागलं. ती खुंटी उखडून काढल्यावर त्या भेगेत त्याचं शेपूट अडकलं ज्यामुळे ते मारून गेलं. म्हणूनच म्हणतात, 'निरुपयोगी कामाचा विचार करून काय फायदा!' 

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices