रियाज' कलाकाराला जिवंत ठेवतो. मग कला कुठलीही असो! माणसाचं दृश्याबरोबर एक खोल नातं असतं. ते नातं जगविख्यात चित्रकार वासुदेव कामत चित्राच्या माध्यमाचा आधार घेत समजावून सांगतात. बालपणापासूनच त्यांच्या कलेचं चित्र कसं रेखाटलं गेलं ह्याविषयी ते दिलखुलास गप्पा मारतात. विविध किस्से, कथा यांतून ते त्यांची चित्रकार म्हणून झालेली घडण उलगडून सांगतात. कलाकाराच्या अंतरंगातली बैठक त्याच्या चित्रातून कशी व्यक्त होते हे वासुदेव कामत यांच्या व्हिडीओ पॉडकास्टमध्ये बघूया!
--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/manaday-with-anagha/message