विषय - मराठी पुस्तक Review (Marathi Book Review )

Podcast Host - Dwitiya Sapkal / Sonawane

पुस्तक परिचय 

पुस्तक - मून टाइम 

लेखिका - गीता बोरा 

प्रकार - माहितीपर. पाळी, ऋतुस्त्राव याबद्दल शास्त्रोक्त माहिती देणारी, हि एक चित्रकथा आहे. वय वर्षे ८ ते १८ पर्यंतच्या मुलीं आणि त्यांच्या पालकांसाठी हे पुस्तक आहे. 

प्रकाशक - Spherule Foundation - https://spherule.org/, Email: contact@spherule.org

हे पुस्तक एका कॉमिक च्या स्वरूपात आहे. यामध्ये एका मुलीला अचानक पाळी येते आणि मग तिला एक डॉक्टर मावशी, साध्या सोप्या भाषेत आणि चित्रांद्वारे सर्व माहिती समजावून सांगते. पुस्तकाचे वाचक मुली आहेत, हे लक्षात घेऊन हे पुस्तक लिहिले असल्यामुळे, ते कुठेच बोजड होत नाही, इन फॅक्ट, पालक म्हणून, आपल्याला देखील , ते वाचायला अतिशय सोपे आणि इंटरेस्टिंग वाटते. 

बऱ्याच भारतीय , इंग्लंड आणि अमेरिकन डॉक्टर्स च्या चमूने, या पुस्तकावर शिक्कामोर्तब केलेले आहे. या पुस्तकातील, डॉक्टर्सच्या विशेष विभागामध्ये, डॉक्टरांची ओळख आणि आपल्या मुलींसाठी त्यांनी दिलेले अमूल्य सल्ले, याची नोंददेखील केलेली आहे. 

Music Credits:
––––––––––––––––––––––––––––––
Track: SkyHigh — Enine [Audio Library Release]
Music provided by Audio Library Plus
Watch: https://youtu.be/q-lf6x9cVXw​
Free Download / Stream: https://alplus.io/skyhigh
––––––––––––––––––––––––––––––

 

#SpheruleFoundation,#bookreview,#marathibooks,#marathiauthors #granthpremi,#MoonTime,#GeetaBora,#ग्रंथप्रेमी,#मराठीपुस्तके,#मराठीपॉडकास्ट,#मराठीपुस्तकपरीक्षण,#गीताबोरा,