Pujara व Umesh Yadav ला टाटा, Yashasvi व Ruturaj ला संधी मिळेल आता ?
Sports कट्टाJune 24, 202300:11:0210.13 MB

Pujara व Umesh Yadav ला टाटा, Yashasvi व Ruturaj ला संधी मिळेल आता ?

पुजारा व उमेशला टाटा, यशस्वी व ऋतुराजला संधी मिळेल आता? वेस्ट इंडिज दौ-यासाठी भारताच्या टेस्ट व ODI संघांची घोषणा झाली आहे. छोटे का असेना, बदलांना सुरूवात झाली आहे. एका तपाहून जास्त भारताची एक बाजू लावून धरणारा चेतेश्वर पुजाराला मिळालेला डच्चू, यावरून तो अखेरची टेस्ट मॅच खेळला आहे असं गृहित धरायला हरकत नाही. उमेश यादवचा भारतातला रेकॉर्ड चांगला असला, तरी परदेशात त्याला विकेट मिळत नाहीत, त्यामुळे त्याचाही या दौ-यासाठी विचार झालेला नाही. ऋतुराज गायकवाड किंवा यशस्वी जयस्वाल यापैकी एक जण वेस्ट इंडिजमध्ये कसोटी पदार्पण करणार, हे निश्चित आहे. त्याचप्रमाणे एकदिवसीय संघनिवडीमधून वर्ल्ड कपच्या संघाचे संकेत मिळत आहेत. या सगळ्याचा आढावा आपल्यासमोर घेऊन येत आहे आदित्य जोशी.

Cheteshwar Pujara and Umesh Yadav have been dropped from India's squad for the Test series in the West Indies. Mohammed Shami has been rested. And the likes of Ruturaj Gaikwad, Yashasvi Jaiswal and Mukesh Kumar have been included in the 16-member squad for the two-Test series. Does this mean that the national selection committee has set the succession plan in place? Besides the Test squad, does the ODI squad give a clear indication about India's core of 20 players for the 2023 World Cup? Aditya Joshi gives an insight into the squad selection.