वयस्कर संघ. दोन महत्त्वाच्या खेळाडूंची अनुपस्थिती. आणि इंग्लंडचा झंझावात. ह्या सर्वांच्या पलीकडे जाऊन "बी. यु. भंडारी प्रस्तुत T२० आतषबाजी" मध्ये अमोल कऱ्हाडकर मांडत आहे दोन नाजुक मुद्दे ज्यामुळे भारताचा उपांत्य सामन्यातील पराभव जिव्हारी लागला. पॉवरप्लेमधील कामगिरी आणि त्याच्याशीच निगडित असलेले तेच पहिल्या तीन क्रमांकाचे फलंदाज हा एक अनाकलनीय मुद्दा होत आहे. २०२४ साठी आम्ही ठेवत आहोत काही पर्याय ज्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.