CCBK Special, अर्जुन तेंडुलकर आणि ट्रोलिंग
Sports कट्टाApril 23, 202300:08:367.91 MB

CCBK Special, अर्जुन तेंडुलकर आणि ट्रोलिंग

त्याने सामन्यात महत्वाच्या क्षणी अप्रतिम यॉर्कर टाकून संघाला बळी मिळवून दिला, त्यानंतर अजून एका महत्वाच्या क्षणी मात्र त्याच्या षटकात प्रतिस्पर्ध्यांनी खूप धावा कुटल्या, संघ हरला. त्यानंतर त्याला समाजमाध्यमांमध्ये 'ट्रोल' करण्यात आलं.
त्याने शेवट पर्यंत संघाला विजय मिळवून देण्यासाठी फलंदाजी केली. असं वाटलं कि तो एकटा संघासाठी लढतो आहे, आणि विजय अगदी हातातोंडाशी आला आहे. पण अखेरच्या क्षणी तो बाद झाला, आणि अर्थात, संघ हरला. त्यानंतर त्याला समाजमाध्यमांमध्ये 'ट्रोल' करण्यात आलं.
ह्या दोन गोष्टी नुकत्याच घडलेल्या IPL सामन्यांबद्दल आहेत, त्या कोणाबद्दल आहेत हे देखील तुम्ही ओळखलं असेल.
CCBKच्या ह्या विशेष भागात आदित्य जोशी टिपण्णी करत आहे एकंदरीत मिम कल्चर, ट्रोलिंग, त्याचा खेळाडूंवर होणार परिणाम आणि अर्जुन तेंडुलकरला केवळ 'सचिन तेंडुलकरचा मुलगा' ह्या चष्म्यातून बघण्याच्या दृष्टिकोनाबद्दल...

He gave his side a wicket at a vital point in the game but later conceded plenty of runs in one over. His team lost and he was ‘trolled’ on social media.
He batted throughout the innings to take his side close to a win. He did the bulk of the scoring but was dismissed at a crucial point. His team lost and he was ‘trolled’ on social media.
These two stories are from recent IPL games and I am sure you’ve guessed correctly, who we are referring to.
In this CCBK special episode, Aditya Joshi talks about Meme culture, trolling, the toll it takes on the players, and people judging Arjun Tendulkar only as a son of Sachin Tendulkar…