२०२२ च्या सुरुवातीला भारतीय क्रिकेट संघाकडून खूप अपेक्षा होत्या, परंतु प्रत्यक्षात मात्र रसिकांच्या दृष्टीने निराशा झाली. राहुल द्रविडसारखा माजी खेळाडू प्रशिक्षक आणि पाच वेळा आयपीएल जिंकलेला कर्णधार रोहित शर्मा यांची जोडी अजून तरी कमाल करू शकलेली नाही. २०२३ मध्ये तरी आपण मॉडर्न क्रिकेट खेळायला लागू आणि नवीन निवड समिती संघामध्ये आवश्यक ते बदल करण्याची धमक असणारी असेल या आशेवर २०२३ सुरूवात करूया. तोपर्यंत पाहूया २०२२ मधील भारतीय पुरुष व महिला क्रिकेट संघामधील 'हिरो' आणि 'झिरो' 'बी. यु. भंडारी प्रस्तुत CCBK एक्स्प्लेनर' म