महाराष्ट्रात जे बाळासाहेब ठाकरे यांनी केलं, तेच शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलं का, हा प्रश्न उपस्थित होतो आहे. निमित्त ठरलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून झालेली सुप्रिया सुळे यांची निवड. नेमका घराणेशाहीचा इतिहास काय? राष्ट्रवादी काँग्रेस होणारा घराणेशाहीच्या आरोपांमागची पार्श्वभूमी काय? ते आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.


