पहाटेचा शपविधी असो...अथवा आपल्या म्हणजे शरद पवारांशी असलेले मतभेद असो...जयंत पाटलांशी पक्षांतर्गत वर्चस्वाशी स्पर्धा असो...अथवा माध्यमांशी बोलताना एखाद्या नेत्याची केलेली खरडपट्टी असो...कारण काहीही असो अजित पवार हे बातम्यांच्या केंद्रस्थानी असतात हे खरंय..त्याच अजित पवारांबाबत तुम्हाला काही इंन्ट्रेस्टींग फॅक्ट सांगणार आहोत जे ऐकून अनेकांन आश्चर्याचा धक्का बसेल. कुणीच तोडू शकणार नाही, असे राजकारणातले काही खास रेकॉर्ड अजितदादांच्या नावावर नोंदवले गेलेत. ते रेकॉर्ड नेमके कोणते आहेत, हे आज स्पेशलच्या खास पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत


