मामाची मुलगी किंवा आत्याचा मुलगा यांच्याशी लग्न लावून देण्याचा प्रकार फार जुना आहे. पण हा प्रकार चिंताजनक मानला जातोय. नात्यातच लग्न लावून देणं धोक्याचं मानलं जातंय. तसं केल्यानं थॅलेसेमिया आजार होण्याचा संभव असतो. असं कशामुळे होतं? त्यामागचं कारण काय? नेमकं याबाबत जाणकारांचं काय मत आहे? तेच आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत


